Aarya 3: अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. काही दिवसांपूर्वी तिची ताली (Taali) ही वेब सीरिज रिलीज झाली होती. आता तिच्या आर्या-3 (Aarya 3) या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच सुष्मितानं आर्या-3 या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


कधी रिलीज होणार आर्या-3?


सुष्मिता सेनने शुक्रवारी (6 सप्टेंबर) सोशल मीडियावर अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये पिवळ्या भिंतीवर पंजाच्या खुणा दिसतात. त्यानंतर स्क्रीनवर  3 नोव्हेंबर ही तारीख दिसते. या व्हिडीओला सुष्मितानं कॅप्शनमध्ये लिहिले की,  “शेरनी के लौटने का वक्त आ गया है.” सुष्मिताची आर्या-3 ही वेब सीरिज 3 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं सुष्मिताच्या व्हिडीओला कमेंट केली, 'प्रतीक्षा संपली. आर्य परत आली आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आर्या वेब सीरिजच्या दोन्ही सीझन्स 4 ते 5 वेळा पाहिले आहेत. आता सीझन 3 ची लवकर वाट पाहत आहे.शेरनी परत आली आहे.'


पाहा व्हिडीओ:






 राम माधवानी आणि संदीप मोदी दिग्दर्शित, आर्या  ही वेब सीरिज लोकप्रिय डच क्राईम-ड्रामा Penose चा अधिकृत रिमेक आहे.   ही  सीरिज Disney Plus Hotstar वर  प्रीमियर होईल, असं म्हटलं जात आहे.


आर्या या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीझनमध्ये सुष्मितासोबतच  चंद्रचूर सिंह, नमित दास, अंकुर भाटिया  आणि विकास कुमार या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता आर्या-3 ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


काही दिवसांपूर्वी सुष्मिताची ताली वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजचं अनेकांनी कौतुक केलं. आता ताली या वेब सीरिज प्रमाणेच सुष्मिताच्या आर्या-3 या वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Aarya 3 Teaser : आधी सिगारचा झुरका, नंतर बंदुक केली लोड; सुष्मिताच्या 'आर्या 3' च्या टीझरची जोरदार चर्चा