Sushmita Sen Aarya Season 3 Teaser : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'आर्या' (Aarya) या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून लवकरच या वेबसीरिजचा तिसरा सीझन (Aarya 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर आऊट झाला आहे. टीझरमध्ये सुष्मिताचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 


'आर्या 3'च्या टीझरमध्ये सुष्मिता सिगार ओढताना बंदुकीत गोळी घालताना दिसत आहे. तसेच काळ्या रंगाच्या गॉगलमधील तिचा डॅशिग अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सुष्मिताने सोशल मीडियावर 'आर्या 3'चा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने लिहिलं आहे,"ती पुन्हा आली आणि ती म्हणजे व्यवसाय. 'आर्या 3'च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. लवकरच ही वेबसीरिज तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टावर पाहता येणार आहे". 


सुष्मिता सेनने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे,"आर्या 3'साठी आम्ही खूप उत्सुक आहोत". तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे,"आता नव्या सीझनची प्रतीक्षा आहे". 






सुष्मिता सेनने जून 2020 मध्ये 'आर्या' या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. आपल्या कुटुंबियांच्या बचावासाठी काहीही करण्यास तयार असणारी सुष्मिता या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या सीरिजमधील सुष्मिताच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. 


'आर्य 3'च्या शूटिंगला सुरुवात!


सुष्मिता सेनने 'आर्य 3' या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली,"आर्या टीम पुन्हा एकदा 'आर्या 3'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा आर्याचे पात्र साकारताना या नवीन प्रवासादरम्यान खूप गोष्टी शिकता येत आहेत. राम माधवानी यांच्या सोबत आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर काम करताना खूप आनंद होत आहे. आर्याला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे. यापुढे असंच प्रेम मिळत राहो ही अपेक्षा". 


'आर्या' या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पहिल्या सीझनला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एमी पुरस्कार सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट नाट्य' या कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राम माधवानी यांनी सांभाळली आहे. तर नमित दास, मनीष चौधरी आणि विनोद रावतदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 


संबंधित बातम्या


Aarya 2 Trailer : 'आर्या-2' चा ट्रेलर प्रदर्शित; लेडी डॉनच्या भूमिकेत सुष्मिता सेन, दमदार लूक चर्चेत