मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रातून सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली. मात्र, महिनाभराचा तपास आणि पंचवीस जणांच्या जबाबानंतरसुद्धा सीबीआयच्या हाती काहीच लागलं नाही. सुशांतची हत्या झाली? की त्याने आत्महत्या केली? जर हत्या झाली तर कोणी केली? आणि आत्महत्या झाली तर का केली? या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत आली होती. मात्र, महिन्याभरानंतरही हे प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत.


महिन्याभराआधी सीबीआयची टीम मुंबईमध्ये तपासासाठी दाखल झाली होती. मात्र, सीबीआयच्या तपासात काहीचं निष्पन्न झालं नाही. लोकांचे जवाब नोंदवले गेले. सुशांत सिंग राजपूतच्या घरी 2 वेळा रिक्रिएशन केलं गेलं. मात्र, तरीही सीबीआय काही ठोस असं मिळवू शकली नाही. आत्तापर्यंतच्या झालेला तपासाचा रिपोर्ट सादर करण्यासाठी सीबीआयची 1 टीम दिल्लीला रवाना झाली आहे. या महिन्याभरात सीबीआयच्या हाती काय लागलं, त्यांना काय पुरावे मिळाले त्या कुठल्या निकषांवर पोहोचले याचा रिपोर्ट सादर करतील. तसेच पुढील तपासाची दिशा निर्देश ठरवल्या जाणार आहेत.


सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरु असलेल्या मीडिया ट्रायलविरोधात हायकोर्टात आणखी एक याचिका


नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोची एन्ट्री झाली आणि त्यांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला. अटक सत्र सुरू झाले. दहा दिवसांच्या तपासामध्येच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो रिया चक्रवर्ती आणि ड्रग्सचं कनेक्शन स्पष्ट करून रिया चक्रवर्तीला अटक केली. मात्र, आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा एक अधिकारी पॉझिटिव्ह आला आहे. ही टीम सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्सच्या अनुशंगाने तपास करत आहेत. आज श्रुती मोदी आणि जया शहा यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, अधिकाऱ्याची अँटीजीन रॅपिड टेस्ट पॉझिटिव आल्यामुळे श्रुती मोदीला तात्काळ घरी पाठवण्यात आलं.


अधिकाऱ्यांसोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे येणारे पुढील काही दिवस आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. महिन्याभराच्या तपासानंतरही सीबीआय कुठल्याही निकषावर पोहोचू शकली नाही. त्यामुळे आता सीबीआयच्या तपासाची दिशा काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


How does Drug Racket work? बॉलिवूडमध्ये ड्रग्जची तस्करी कशाप्रकारे होते? कोणते ड्रग्ज जास्त प्रमाणात वापरले जातात?