मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना राजस्थानातील जयपूरमध्ये मारहाण झाल्यानंतर, बॉलीवूडकरांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. चित्रपटाच्या कथेला आक्षेप घेत राजपूत समाजाशी संबंधित करणी सेनेने भन्साळींवर हल्ला केला.

जयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाण


 


जयपूरमधील या मारहाणीनंतर अनेक दिग्दर्शकांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी संजय लीला भन्साळी यांचं समर्थन केलं. आता अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धाडसी पाऊल उचलत भन्साळींचं समर्थन केलं आहे.

भन्साळींवरील हल्ल्याविरोधात बॉलिवूड एकवटलं


 

आपल्या आडनावाला आपण जोपर्यंत धरुन बसू, तोपर्यंत हे आपल्याला सहन करावं लागेल. तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या पहिल्या नावालाच तुमची ओळख बनवा, असं म्हणत सुशांतने ट्विटवरुन राजपूत हे आडनाव हटवलं.

https://twitter.com/itsSSR/status/825043568964227072

भन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्द


 

सुशांतने राजपूत समाजाकडून करण्यात आलेल्या या मारहाणीचा निषेध आपलं आडनाव हटवून केला आहे.

आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?


 

माणुसकी आणि प्रेमापेक्षा कोणतीच जात मोठी नसून धर्म आणि दयाच आपल्याला माणूस बनवते. हे सर्व विभाजन स्वतःच्या फायद्यासाठी केलं जातं, असंही सुशांतने म्हटलं आहे.

https://twitter.com/itsSSR/status/825578463893413888

भन्साळी मारहाण प्रकरण, पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका म्हणते...


 

सेलिब्रिटींकडून हल्ल्याचा निषेध

अभिनेत्री प्रियांका चोप्रा, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल, रितेश देशमुख, हृतिक रोशन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे.

‘पद्मावती’च्या सेटची तोडफोड

जयगड किल्ल्यात भन्साळी यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन निषेध केला.  त्यांनी सेटवरील सामानाचीही तोडफोड केली. तसंच संजय भन्साळी यांच्या थोबाडात मारली. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.