नवी दिल्ली: जयपूरमध्ये पद्मावती सिनेमाच्या शूटिंगवेळी फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भन्साळी यांच्यासोबत बॉलिवुडची अख्खी फळी उभी राहिली आहे. आता यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिनेही प्रतिक्रिया व्यक्त करताना, पंतप्रधानांनी बॉलिवूडसाठी भूमिका घ्यावी, असं आवाहन केलं आहे. सोनम कपूरनं इंस्टाग्रामवर पंतप्रधानांचे एक ट्वीट एक पोस्ट केलं असून, त्याला धरुन तिने पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये तिने, ''सर तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छिते, प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसानंतरच माला हे सांगावं वाटतं, की आमची सिने इंडस्ट्री प्रत्येक प्रकारचा अपमान सहन करत आहे. हे खरंच फार दुर्दैवी आहे. कृपया तुम्ही यावर भूमिका घ्यावी...#पद्मावती'' म्हणलं आहे. यापूर्वीही सोनमने काल ट्वीट करुन या हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं होतं. सोनमच्या कालच्या ट्वीटमध्ये, पद्मावतीच्या सेटवर जे काही घडलं, ते अतिशय भयावह आणि निषेध करण्याजोगे आहे. हेच जग आहे का?'' असा सवाल उपस्थित केला होता. संबंधित बातम्याजयपूरमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मारहाणभन्साळींवरील हल्ल्याविरोधात बॉलिवूड एकवटलंभन्साळी मुंबईला परतणार, 'पद्मावती'चं शूटिंग रद्दआरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती?भन्साळी मारहाण प्रकरण, पद्मावतीची भूमिका साकारणारी दीपिका म्हणते...