Sur Nava Dhyas Nava Grand Finale : 'सूर नवा ध्यास नवा' (Sur Nava Dhyas Nava) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या 31 डिसेंबरला या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. वर्षाचा शेवटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना संगीताची मेजवानी मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. तसेच विनोदाचा बादशाह मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) आपल्या नृत्याचा जलवा दाखवणार आहेत. 


'सूर नवा ध्यास नवा'चा ग्रँड फिनाले


'सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा' या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम सहा पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. 






‘सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा’ ग्रँड फिनाले सर्वोत्तम सहा स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्तिथीत पार पडणार आहे. माधुरी दीक्षित, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.


'सूर नवा ध्यास नवा'चा दिमाखदार ग्रँड फिनाले


'सूर नवा ध्यास नवा'चा ग्रँड फिनाले दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम सहा स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे. 


'सूर नवा ध्यास नवा'चा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसून बॉलिवूड धक धक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच ग्रँड होणार आहे. मनोरंजनाच्या जादूने भरलेल्या सोहळ्यात मग्न होण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


'सूर नवा ध्यास नवा'चा ग्रँड फिनाले 
कधी होणार? 31 डिसेंबर
किती वाजता? संध्याकाळी 7 वाजता
कुठे पाहता येईल? कलर्स मराठी


संबंधित बातम्या


Sur Nava Dhyas Nava : 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' होणार सुरू; जुनी गाणी नव्या रुपात सजणार