Rajinikanth Uddhav Thackeray Meet : मूळचा मराठी असलेल्या, दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree) जाऊन भेट घेतली आहे. रजनीकांत यांनी उद्धव ठाकरेंची राजकीय भेट घेतली नसून सदिच्छा भेट घेतली आहे.
रजनीकांत हे 17 मार्चपासून मुंबईत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामना त्यांनी वानखेडे स्टेडियममध्ये बघितला. मुंबईत आल्यावर रजनीकांत हे आवर्जून मातोश्रीवर भेट देत असतात. रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांशी चांगले संबंध आहे. तसेच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत.
रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असली तरी या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. उद्धव ठाकरेंसाठी सध्याचा काळ कठिण असून त्यांच्या जवळील अनेक मंडळी त्यांच्यापासून दुरावले आहेत. पण तरीही रजनीकांत यांनी न विसरता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यावेळी रजनीकांत आणि उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेदेखील उपस्थित होते.
रजनीकांत यांनी लुटला क्रिकेट सामन्याचा आनंद
मीडिया रिपोर्टनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी बीसीसीआयने (BCCI) रजनीकांत यांना आमंत्रित केले होते. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचे स्वागत केले. सामनादरम्यानचे रजनीकांत यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रजनीकांत यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि इतर मान्यवरांनी मॅच पाहण्यासाठी हजेरी लावली होती.
रजनीकांत सहकुटुंब मुंबईत आले असून ते दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत आहेत. यापूर्वीही रजनीकांत हे मुंबई दौऱ्यावर असताना बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी रजनीकांत त्यांच्या रोबोट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत होते आणि त्यांनी मातोश्रीवर बाळा साहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी तमिळचं राजकारण आणि सिनेसृष्टीसह वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या होत्या. आता उद्धव ठाकरे आणि रजनीकांत यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची सर्वांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या