MC Stan : 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) विजेता एमसी स्टॅनच्या (MC Stan) लाईव्ह कॉन्सर्टचे देशभरात विविध ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एमसी स्टॅनने 'इंडिया टूर'चं आयोजन केलं आहे. त्याअंतर्गत तो देशभरातील विविध शहरांमध्ये जाऊन आपल्या रॅप शोचं आयोजन करत आहे. अशातच आता रॅपरच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाकडून (Bajrang Dal) मारहाण करत त्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. 


पब्लिक स्टॅंड्स विथ एमसी स्टॅन!


एमसी स्टॅनच्या इंदूरमधील लाईव्ह शो दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्याचा शो बंद पाडला आहे. त्यामुळे आता त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहेत. 'पब्लिक स्टॅंड्स विथ एमसी स्टॅन' हा ट्रेंड सध्या ट्विटरवर सुरू आहे. 










बजरंग दलाने विरोध का दर्शवला? 


17 मार्चला एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे इंदूरमध्ये आयोजन करण्यात आले होते. दरम्यान याच कार्यक्रमादरम्यान बजरंग दलाने विरोध दर्शवला आहे. एमसी स्टॅन त्याच्या गाण्यात शिवीगाळ आणि महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला. तसेच तो त्याच्या गाण्यात ड्रग्जला प्रोत्साहन देतो असेही दलाचे म्हणणे आहे. त्यामुळेच बजरंग दलाने एमसी स्टॅनचा लाईव्ह कार्यक्रम बंद पाडला आहे. 


एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टबद्दल जाणून घ्या...


आज 18 मार्चला नागपुरात एमसी स्टॅनच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर थेट 28 एप्रिलला अहमदाबादमध्ये, 29 एप्रिलला जयपूर आणि 6 मे रोजी कोलकाता तर 7 मे रोजी दिल्लीत त्याचा लाईव्ह शो पार पडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्यामुळे एमसी स्टॅनचा आजचा नागपुरातील शो रद्द होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.






संबंधित बातम्या


MC Stan: एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मंडलीची हजेरी; 'भाई' म्हणत शिव, निम्रित आणि सुंबुलनं केला सपोर्ट