सिनेमात किसिंग सीन करणार नाही, सनी लिऑनची करारात अट
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2016 06:38 PM (IST)
मुंबई: बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री सनी लिऑननं आपल्या करारात एका अशी अट घातली आहे की, ज्यामुळे सिनेनिर्माते नाराज होऊ शकतात. यापुढे आपण सिनेमात लिप लॉक सीन करणार नसल्याचं तिनं म्हटलं आहे. सनी लिऑननं एका करार तयार केला असून त्यात आपण यापुढे सिनेमात किसिंग सीन करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत सनी लिऑननं केलेल्या सिनेमात अनेक किसिंग आणि इंटिमेट सीन्सचा भडीमार असायचा. नुकताच तिचा रिलीज झालेला सिनेमा वन नाइट स्टॅण्ड रिलीज झाला. ज्याला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. बॉलिवूडमधील अनेक नट्या ऑन स्क्रिन किसींग सीन पसंत करीत नाही. त्यामध्ये आता सनी लिऑनचंही नाव जोडलं आहे.