भारतात येण्यापूर्वी जस्टीन बीबरला अभिनेत्री सनी लिओनीने डान्सविषयी एक खास सल्ला दिला आहे. सनी लिओनीचा हा सल्ला दिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
''बीबर मी सनी लिओनी, भारतात तुझं स्वागत करते आणि सोबतच तुला एक सल्लाही द्यायचाय. तू स्टेजवर परफॉर्मन्स करशील तेव्हा मी सांगितलेली ही स्टेप नक्की कर'', असं म्हणत सनीने ती स्टेप करण्याची मागणीही जस्टीन बीबरकडे केली आहे.
जस्टिन बिबरच्या 10 मेच्या शोसाठी तिकीट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या कार्यक्रमासाठी कमीत कमी तिकीट 5040 रुपये आहे, तर प्लॅटिनम तिकीट 15400 पर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही तिकीट ईएमआयवरही मिळत असल्याचंही बोललं जात आहे.
https://twitter.com/Popdiarieslive/status/858586649604894721
कोण आहे जस्टीन बीबर?
बेबी…बेबी… हे गाणं जर कोणी ऐकलं-पाहिलं असेल, तर त्याला जस्टिन बिबर कोण हे सांगण्याची गरज नाही.
जस्टिन बिबर हा जगभरात गाजलेला पॉप गायक आहे. अवघ्या 23 वर्षांचा जस्टिन बिबरचा जन्म कॅनडात 1994 मध्ये झाला.
जस्टिन बिबर तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचीच झलक ट्विटरवर पाहायला मिळते. ट्विटरवर जस्टिन बिबरचे 9 कोटी 34 लाख 42 हजार फॉलोअर्स आहेत.
इतकंच नाही तर एकेकाळी जस्टिन बिबरसोबत सेल्फी काढण्यासाठी 2000 डॉलर अर्थात लाखापेक्षा जास्त रुपये खर्च करावे लागत.
जस्टिन बिबरने मानाचा ग्रॅमी अवॉर्ड पटकावला आहे. इतकंच नाही तर जगप्रसिद्ध फोर्ब्ज मासिकाने त्याला तीन वेळा जगातील सर्वात पॉवरफुल्ल सेलिब्रिटी म्हणून गौरवलं आहे.
गेल्या 5 वर्षात जस्टिन बिबर हे नाव सातत्याने ऐकायला मिळालं. पूर्वी लोक हे नाव ऐकून न ऐकल्यासारखं करायचे, मात्र आता त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत.
जस्टिन बिबरकडे डिजीटल मीडियातील एक सक्सेस स्टोरी म्हणून पाहिल जातं. कारण 2008 मध्ये त्याचे काही यूट्यूब व्हिडीओ समोर आले आणि एका टॅलेंट मॅनेजरने त्याचे पाय पाळण्यात ओळखले.
जस्टिन बिबरचा 2010 मध्ये एक स्टुडिओ अल्बम रिलीज झाला आणि तो रातोरात स्टार झाला.
संबंधित बातम्या :