सनी लिओनीसोबत प्रँक करणं सहकाऱ्याला महागात
एबीपी माझा वेब टीम | 27 Nov 2017 05:45 PM (IST)
काहीच दिवसांपूर्वी सनी लिओनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत सेटवरील एका सहकार्याने तिच्या अंगावर साप टाकून प्रँक केलं होतं. यावेळी सनी लिओनीची मोठी घाबरगुंडी उडाली होती.
मुंबई : काहीच दिवसांपूर्वी सनी लिओनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत सेटवरील एका सहकार्याने तिच्या अंगावर साप टाकून प्रँक केलं होतं. यावेळी सनी लिओनीची मोठी घाबरगुंडी उडाली होती. पण सनीसोबत प्रँक करणं, त्या सहकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्या प्रँकचा बदला घेतलेला व्हिडीओ सनीने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिच्या हातात दोन चॉकलेट केक दिसत आहेत. हे केक घेऊन ती हळूच त्या सहकाऱ्याच्या पाठिमागे जाऊन उभी राहते, ज्याने तिच्या अंगावर साप टाकला होता. पाठिमागे उभी राहिल्यानंतर सनी आपल्या हातातील दोन्ही केक त्या सहकाऱ्याच्या कानांवर बडवते, आणि तिथून पळ काढते. यानंतर तो सहकारी देखील तिला पकडण्यासाठी तिच्या पाठिमागे धावू लागतो, पण ती त्याच्या हाती लागत नाही. दरम्यान, सनी लिओनी आपल्या आगामी 'तेरा इंतजार' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असून, यात ती अरबाज खानसोबत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. संबंधित बातम्या सहकाऱ्यांच्या प्रतापानं सनी लिओनीची घाबरगुंडी