Lalbaugcha Raja Mumbai: देशासह राज्यभरात गणेशोत्सव  (Ganeshostav 2023) उत्साहानं साजरा केला जात आहे. विविध मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. नुकतेच अभिनेत्री सनी लिओनीनं (Sunny Leone) शुक्रवार (22 सप्टेंबर) मुंबईतील (Mumbai) 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं आहे. सनीचा पती डॅनियल वेबरनं (Daniel Weber) देखील सनीसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.  


सनी लिओनीनं तिच्या पतीसह 'लालबागच्या राजा'चं  दर्शन घेतलं आहे. ANI या वृत्तसंस्थेनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर हे 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सनी ही पिंक कलरचा आऊटफिट, डोक्यावर ओढणी आणि चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहे.


पाहा व्हिडीओ:






'या' सेलिब्रिटींनी घेतलं 'लालबागच्या राजा'चं दर्शन


संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी देशासह राज्यभरातून भाविक येत असतात. मंडळाच्या मंडपात गणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची अभूतपूर्व गर्दी होते. अनेक सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. अभिनेता शाहरुख खान  (Shahrukh Khan), कार्तिक आर्यन (Kartik Aryan), ईशा देओल (Esha Deol), विकी कौशल (Vicky Kaushal) या सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. 


यंदाचा लालबागच्या राजाचा दरबारात रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही कलाकृती कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांची अखेरची कलाकृती आहे. लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला पुढील वर्षी 350 वर्षी पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लालबागचा मंडपात रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.


सनीचा ‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक हे सनीच्या जीवनावर आधारित आहे. तसेच सनीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी सनीच्या  'कॅनेडी (Kennedy)' या चित्रपटाचा प्रीमियर 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' मध्ये  पार पडला आहे. या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'स्टँडिंग ओव्हेशन'  मिळालं आहे.सनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Mumbai: शाहरुख खान लालबागच्या राजाच्या दर्शनाला; मुलगा अबराम खानसह बाप्पा चरणी लीन