Ganesh Chaturthi 2023: अभिनेता शाहरुख खानने गुरुवारी (21 सप्टेंबर) मुंबईतील 'लालबागच्या राजा'चं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं. यावेळी शाहरुखचा (Shahrukh Khan) धाकटा मुलगा अबराम खान (AbRam Khan) देखील त्याच्यासोबत होता. शाहरुखचा छोटा मुलगा अबराम हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, अबरामच्या गोड हास्यावर शाहरुखचे अनेक चाहते फिदा आहेत. बापलेकाच्या जोडीने 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेतल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांकडून आता हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.






शाहरुखनं वेधलं साऱ्यांचं लक्ष


यावेळी शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी (Pooja Dadlani) देखील त्यांच्यासोबत होती. शाहरुखने व्हाईट कुर्ता परिधान केला होता. एन्ट्री वेळी डोळ्यांवर गॉगल आणि मागे बांधलेल्या केसांच्या लूकने शाहरुखने सर्वांचं लश्र वेधून घेतलं. यावेळी नेहमीप्रमाणे चाहत्यांची मंडपात गर्दी देखील पाहायला मिळाली. शाहरुख मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यानं भाविकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचली होती.


मागील वर्षी फक्त धाकट्या मुलाने घेतलं दर्शन


2022 मध्येही गणेशोत्सवादरम्यान शाहरुखचा धाकटा मुलगा 'लालबागच्या राजा'चं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता, त्यावेळी शाहरुख त्याच्यासोबत उपस्थित नव्हता. मात्र यंदा शाहरुख आणि अबराम यांनी एकत्र बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.


लालबागचा राजा आणि सेलिब्रेटींचं नातं


बॉलीवूडचे सेलिब्रेटी (Bollywood Celebrity at Lalbaugcha Raja) आणि लालबागचा राजा यांचं नातं तसं बरंच जुनं आहे. दरवर्षी लालबागच्या राजाला मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित राहत असल्याचं दिसून आलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठमोठे सेलिब्रेटी हजेरी लावत आहेत. त्यात किंग खानच्या उपस्थितीनं हजारो भाविकांचं लक्ष वेधून घेतलं.


दोन दिवसांआधी कार्तिक आर्यननेही घेतलं दर्शन


बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) देखील 19 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेतलं, याचे फोटोही सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कार्तिकने भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. कार्तिक आर्यनला पाहायला भाविक भक्तांची चांगलीच झुंबड उडाली होती. कार्तिकने पहिल्याच दिवशी सकाळी लवकर जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं.


हेही वाचा:


Riteish Genelia Deshmukh : लय भारी..! रितेश-जिनिलियाच्या मुलांनी 'रिसायकल बाप्पा' बनवत गायली आरती; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक