संजू बाबासाठी सनी लिओनीचा नागिन डान्स, व्हिडिओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 13 Aug 2017 10:46 AM (IST)
संजय दत्तच्या भूमी सिनेमाला शुभेच्छा देण्यासाठी सनी लिओनीने खास नागिन डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. संजय दत्तच्या खलनायक सिनेमातील गाण्यावर सनी लिओनीने हा डान्स केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अभिनेता संजय दत्तसाठी जबरदस्त नागिन डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे. संजय दत्तच्या ‘नायक नही, खलनायक हू मैं’ या गाण्यावर सनी लिओनी नागिन डान्स करत आहे. या डान्सद्वारे सनीने संजय दत्तला त्याचा आगामी सिनेमा ‘भूमी’साठी शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तच्या या सिनेमात एका गाण्यात सनी लिओनीही दिसणार आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असेल. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरी ‘भूमी’च्या टायटल रोलमध्ये आहे, तर संजय दत्त अरुण ही भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक शेखर कपूरही या सिनेमात दिसणार आहेत. अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सूडकथा पडद्यावर पाहायला मिळेल, असं अडीच मिनिटांच्या ट्रेलरमधून दिसत आहे. बापलेकीच्या नात्याचा एक वेगळा पैलू सिनेमात उलगडेल.