मोठी विमान दुर्घटना टळली, सनी लिओनी थोडक्यात बचावली
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2017 09:31 PM (IST)
सनी लिऑन
नवी दिल्ली : अभिनेत्री सनी लिओनी आणि तिची टीम आज थोडक्यात बचावली. खराब हवामानामुळे सनी लिओनीचं खाजगी विमान कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सनी लिओनीने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती शेअर केली आहे. खराब हवामानामुळे विमान कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवानी मोठी घटना टळली, असं सनी लिओनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/SunnyLeone/status/869882904012345344 सनी लिओनीने हा व्हिडिओ कारमध्ये शूट केला आहे. ज्यामध्ये तिचा पती डॅनियल वेबर आणि तिच्या टीममधील इतर सदस्यही दिसत आहेत. शिवाय सनीने पायलटचेही आभार मानले आहेत. https://twitter.com/SunnyLeone/status/869888240685371392