Sunny Deol:  अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'गदर 2' चित्रपटामधील  सनी देओलच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत . आता 'गदर 2' चित्रपटानंतर सनी देओल हा 'बॉर्डर 2' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चर्चा दरम्यान सनी देओलनं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सनी देओलची पोस्ट



सनी देओलनं  इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं,'मी काही चित्रपट साइन केल्याच्या बातम्या येत आहेत, मी सांगू इच्छितो की, सध्या मी फक्त गदर 2 वर लक्ष केंद्रित करत आहे आणि मला तुमचे सर्वांचे प्रेम मिळत आहे. मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. योग्य वेळ आल्यावर खास गोष्टीबाबत घोषणा करेन. तोपर्यंत तारा सिंह आणि  गदर 2 वर प्रेमाचा वर्षाव करत रहा.'





बॉर्डर हा ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये  युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. आता बॉर्डर-2 या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.


गदर-2 ठरला हिट


सनी देओलच्या 'गदर 2'  या चित्रपटानं नऊ दिवसांत भारतात 336.13 कोटींची कमाई केली आहे.   या  चित्रपटात सनीसोबतच अमिषा पटेल(Ameesha Patel), लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma),  हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. अनिल शर्मा यांनी गदर-2 या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.






'गदर 2' हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली. या चित्रपटाचं अनेक लोक सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. 'गदर 2' (Gadar 2) या चित्रपटात तारा सिंह आणि सकिना यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Box Office Collection : 15 ऑगस्टला सिनेमागृहात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी; थिएटरमध्ये टाळ्या, शिट्ट्यांच्या जल्लोषात पाहिले गेले 'जेलर', 'गदर 2' आणि 'OMG 2'