Gadar 2: सध्या अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'अॅनिमल' चित्रपटानं 10 दिवसांत 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.  अॅनिमल या चित्रपटाच्या व्यतिरिक्त, जवान (Jawan), पठाण (Pathaan) आणि सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हे चित्रपट देखील 2023 या वर्षाचे ब्लॉकबस्टर चित्रपट ठरले. पण आतापर्यंत कोणताही चित्रपट 'गदर 2' या चित्रपटाचा एक रेकॉर्ड मोडू शकला नाही. तो रेकॉर्ड कोणता? याबाबत जाणून घेऊयात...

'गदर 2' चा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणी तोडू शकलं नाही

'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 40.1 कोटी रुपयांची ओपनिंग केली  'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर 525.45 कोटी रुपये कमावले होते. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडनुसार, 'गदर 2' या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या रविवारी तब्बल 38.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. गदर-2 हा रिलीजनंतरच्या दुसऱ्या रविवारी आतापर्यंत सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. या यादीत 'बाहुबली 2' हा चित्रपट दुसऱ्या स्थानावर आहे ज्याने रिलीजच्या दुसऱ्या रविवारी 34.50 कोटींची कमाई केली होती. पाहा संपूर्ण यादी-

1. 'गदर 2' 38.90 कोटी
2. बाहुबली 2 34.50 कोटी
3. जवान 34.26 कोटी
4. 'अॅनिमल' 33.53 कोटी
5. दंगल 30.69 कोटी
6. संजू 28.05 कोटी
7. पठाण 27.50 कोटी
8. द कश्मीर फाइल्स 26.20 कोटी
9. बजरंगी भाईजान 24.05 कोटी
10. द केरला स्टोरी 23..25  कोटी

गदर-2 ची स्टार कास्ट (Gadar 2 Star Cast)

गदर 2 (Gadar 2) चित्रपटामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात  लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  2001 मध्ये  रिलीज झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा 'गदर 2' हा सिक्वेल आहे. गदर-2 चित्रपटामधील डायलॉग्सला आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनिल शर्मा यांनी 'गदर 2'  या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. 

संबंधित बातम्या:

Sunny Deol Gets Emotional: 'गदर-2' ला मिळत असलेला प्रतिसाद पाहून इमोशनल झाला तारा सिंह; सनी देओलनं व्हिडीओ शेअर करुन प्रेक्षकांचे मानले आभार