Suniel Shetty: काही दिवसांपूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) टोमॅटोच्या वाढत्या दरांबाबत वक्तव्य केलं होतं. टोमॅटोबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे. सुपरस्टार असलो म्हणून काय झालं, आम्हाला देखील महागाईचा फटला बसतो मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले आहे, असे वक्तव्य सुनिल शेट्टीने केले होते. आता या वक्तव्यावर सुनील शेट्टीनं स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला सुनील शेट्टी?
टोमॅटोच्या दरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल सुनील शेट्टीनं स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, 'माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले आहे. मी मनाने देसी माणूस आहे. शेतकऱ्यांचा चुकीचा विचार करणे तर दूरची गोष्ट उलट त्यांना पाठिंबा देण्याचे काम मी नेहमीच केले आहे. आपण आपल्या स्वदेशी गोष्टींचा प्रचार करावा. याचा लाभ आपल्या शेतकऱ्याला नेहमी मिळावा अशी माझी इच्छा आहे. शेतकरी हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. मी हॉटेलवाला असल्याने माझे संबंध नेहमीच त्यांच्याशी थेट राहिले आहेत. जर त्यांना माझ्या कोणत्याही विधानामुळे वाईट वाटले असेल, जे मी बोललो देखील नाही, तर मी त्यांना मनापासून सॉरी म्हणतो. मी स्वप्नातही त्यांच्याविरुद्ध बोलण्याचा विचार करू शकत नाही. कृपया माझे विधान चुकीच्या पद्धतीने कोट करू नका. मी आता यावर जास्त काही सांगू शकत नाही.'
सुनील शेट्टीनं टोमॅटोच्या दरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. परळीतील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टीला मोफत टोमॅटोचे पार्सल पाठवले होते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Rvikant Tupkar) यांनी सुनिल शेट्टीवर टीका केली.
सुनील शेट्टीचे चित्रपट
आवारा पागल दिवाना,दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा,धडकन या चित्रपटांमधून सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीस आला. सुनीलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सुनील हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. तो सोशल मीडियावर देखील विविध पोस्ट शेअर करतो.
महत्त्वाच्या बातम्या: