Amit Sadh Struggle: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमित साध (Amit Sadh)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  अमित साध  हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमितनं त्याच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं. जाणून घेऊयात अमितच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...


एका मुलाखतीमध्ये अमित सांगितलं की, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला त्याच्या रंगामुळे लोकांशी बोलण्याचे धाडस होत नव्हते. त्याच्या पालकांनी कधीही त्याची काळजी घेतली नाही, त्यामुळे त्याचा स्वभाव देखील खूप चिडचिडा झाला होता. यामुळेच त्यानं वयाच्या 16 व्या वर्षी घर सोडले आणि चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.


अमित हा अभिनेता होण्यापूर्वी एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तिथे त्याला 900 रुपये पगार मिळत होता. त्यानंतर  त्याला 'क्यों होता है प्यार' या टीव्ही शोमध्ये आदित्य भार्गवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे अमितला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने 'काय पो छे', 'सुलतान'यां सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले.






 अमित एका मुलाखतीमध्ये त्याच्या सुखी या आगामी मालिकेबाबत देखील सांगितलं. मला  वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. पुढे जे काही येईल ते चांगले होईल असे वाटते.' सुखी या चित्रपटात अमितसोबत शिल्पा शेट्टी देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. अमित आणि शिल्पा यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


ब्रीथ: इंटू द शेडोस, बॅरट हाऊस, अवरोध या ओटीटी शोमध्ये देखील काम केलं. ब्रेथ: इनटू द शॅडोजमध्ये अमित हा पोलीस अधिकारी कबीर सावंतच्या भूमिकेत दिसला. अमितची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. ‘विक्टर’ , ‘द पुणे हायवे’ आणि ‘दुरंगा सीजन 2’ या सीरिजमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


अमित साध हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. अमित हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देतो. इन्स्टाग्रामवर अमितला 1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Anupam Kher: खिशात 37 रुपये घेऊन गाठली मुंबई, आज आहेत कोट्यवधींचे मालक; अनुपम खेर यांची स्ट्रगल स्टोरी जाणून घ्या