Sukesh Chandrashekhar Diwali Wish To Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिसचा (Actress Jacqueline Fernandez) प्रियकर आणि सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) तुरुंगातून अनेकांना पत्र लिहित असतो. आता तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या आठवणीनं व्याकूळ झाला असल्याचं त्यानं पत्र लिहून जॅकलीनला सांगितलं आहे. दिवाळीच्या (Diwali 2024)  निमित्ताने सुकेश चंद्रशेखरनं लिहिलेलं पत्र सध्या चर्चेचा विषय ठरतंय. या पत्रात सुकेशनं त्याची आणि जॅकलीनची लव्हस्टोरी रामायणासारखीच असल्याचं म्हटलं आहे. तसेच, त्यानं जॅकलीनला तुरुंगातून सुटून लवकरच भेटायला येणार असल्याचं आश्वासनही दिलं आहे. 


रामायणाशी केली स्वतःच्या लव्हस्टोरीची तुलना 


पिंकविलानं दिलेल्या वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखर यानं जॅकलीन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "बेबी, आपली प्रेमकथा महान रामायणापेक्षा कमी नाही, कारण जसे माझे भगवान राम वनवासातून सीतेसोबत परतले होते, तसेच मीदेखील माझी सीता जॅकलीनसाठी या छोट्याशा वनवासातून परत येत आहे, जेणेकरून मी तुला परत मिळवू शकेल आणि कोणताही रावण हे होण्यापासून रोखू शकत नाही."


आता माझी घरी परतण्याची वेळ जवळ आलीय : सुकेश चंद्रशेखर   


सुकेश चंद्रशेखरनं पत्रात पुढे लिहिलं आहे की, "भगवान रामाचे सर्व आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे, आता आपली वेळ आली आहे बेबी. कारण, आता माझ्या परत येण्याची वेळ जवळपास आली आहे, मी एकत्र राहण्यासाठी आणि पुढच्या वर्षी एकत्र प्रकाशाचा हा सुंदर उत्सव साजरा करण्यासाठी आता थांबू शकत नाही. लंकेतली तुझ्याशिवाय ही माझी शेवटची दिवाळी असेल, बेबी..."       


"आपल्यात काय आहे, हे जगाला कसं कळेल?"


जॅकलीनला लिहिलेल्या पत्रात सुकेशनं लिहिलंय की, "जगाला वाटेल की, मी वेडा आहे, पण जगाला कसं कळेल की, आपल्यात काय आहे" यापूर्वी सुकेशनं जॅकलिनचा म्युझिक व्हिडीओ 'स्टॉर्मराइडर'ला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांना 25 महिंद्रा थार रॉक्स आणि 200 आयफोन 16 प्रो देणार असल्याचं जाहीर केलं होतं.                             


दरम्यान, जॅकलीन फर्नांडिसच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झआलं तर, काही दिवसांपूर्वी ती म्युझिक व्हिडीओ 'स्टॉर्मराइडर' मध्ये दिसली होती. सध्या ती अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे.