IIFA Awards 2023 : 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (IIFA 2023) सोहळा लवकरच पार पडणार आहे. या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याची सिने तार तारकांना उत्सुकता आहे. नेहमीप्रमाणे यंदाही अबू धाबीमध्येच (Abu Dhabi) यंदाचा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 

'आयफा 2023' कधी पार पडणार? 

अबू धाबीमधील एका बेटावर 'आयफा 2023' हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. 25 मे 2023 रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अनेक सिने तारे तारकांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांनादेखील उत्सुकता आहे. 

सेलिब्रिटींच्या उपस्थितीत रंगणार 'आयफा 2023'

'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' सोहळा तीन दिवस पार पडणार आहे. हा बहुचर्चित पुरस्कार सोहळा राजकुमार राव होस्ट करणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. सलमान खान, नोरा फतेही, कृती सेनन, वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिज आणि रकुल प्रीत सिंह या पुरस्कार सोहळ्यात आपल्या खास सादरीकरणाने चाहत्यांना वेड लावणार आहेत. 

'आयफा 2023' हा पुरस्कार सोहळा आधी फेब्रुवारी महिन्यात होणार होता. पण काही कारणाने हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला. अभिषेक बच्चन 'आयफा 2023' या पुरस्कार सोहळ्याबद्दल म्हणाला,"आयफा 2023'साठी मी खूप उत्सुक आहे. आयफा माझ्यासाठी कौटुंबिक पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यासोबत मी जोडलो गेलो आहे". 

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा 'आयफा 2023' 

'आयफा 2023' हा हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असतं. 'आयफा 2023'च्या नामांकनांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. 

'आयफा 2023' नामांकनाची यादी जाणून घ्या...

सर्वोत्कृष्ट चित्रपट - भूल भुलैया 2- डार्लिंग्स- दृश्यम 2- गंगूबाई काठियावाडी- विक्रम वेधा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- भूल भुलैया 2- डार्लिंग्स- गंगूबाई काठियावाडी- ब्रह्मास्त्र- मोनिका ओ माय डार्लिंग- रॉकेट्री द नंबी इफेक्ट

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- यामी गौतम (एक गुरुवार)- तब्बू (भूल भुलैया 2)- आलिया भट्ट (डार्लिंग्स)- शेफाली शाह (डार्लिंग्स)- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- कार्तिक आर्यन (भूल भुलैया 2)- अभिषेक बच्चन (दसवी)- अजय देवगण (दृश्यम 2)- राजकुमार राव (मोनिका ओ माय डार्लिंग)- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)- ऋतिक रोशन - (विक्रम वेधा)

संबंधित बातम्या

IIFA Awards 2022 : 'आयफा' पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार; कलर्सवर होणार प्रक्षेपण