Subodh Bhave: अभिनेता  सुबोध भावेच्या (Subodh Bhave) कट्यार काळजात घुसली या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा संगीतमय चित्रपट 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीनं बघतात. आता कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर आणखी एका संगीतमय कलाकृतीमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुबोधनं त्याच्या "मानापमान" या आगामी संगीतमय चित्रपटाची घोषणा केली आहे. सुबोधनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या आगामी चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना दिली आहे.


सुबोध भावेची पोस्ट


सुबोध भावेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पुण्यातील FTII बद्दल आणि  "मानापमान" या त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "कट्यारनंतर पुन्हा एखादी संगीतमय कलाकृती सादर करावी अशी आम्हा सर्व टीमची ईच्छा होती. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन आज आम्ही जियो स्टुडिओज आणि    श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्स निर्मित कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या " संगीत मानापमान" या नाटकावरून प्रेरित असलेल्या, "मानापमान " या आगामी संगीतमय चित्रपटाचा मुहूर्त पुण्यातील FTII च्या पवित्र जागेत केला. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद कायम असूदे. मोरया"






सुबोध भावेनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या "मानापमान " या आगामी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र जोशी, समीर चौघुले, सायली संजीव, सुयश टिळक, ऋतुजा बागवे या कलाकारांनी सुबोधच्या पोस्टला कमेंट करुन त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.


आणि डॉ. काशिनाथ घाणेकर,  लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये सुबोधनं काम केलं. तसेच तुला पाहते रे या मालिकेमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता सुबोधच्या "मानापमान" या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात सुबोध सोबतच आणखी कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत? याकडे आता आनेकांचे लक्ष लागले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Balgandharva Movie: नारायण श्रीपाद राजहंस' यांचा खडतर प्रवास मांडणाऱ्या 'बालगंधर्व' ला 12 वर्ष पूर्ण; सुबोध भावे, रवी जाधव यांची खास पोस्ट