Subhedar Movie New Poster Out : 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित या सिनेमात अजय पुरकर (Ajay Purkar) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


दिग्पाल लांजेकर यांनी 'सुभेदार' सिनेमाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"कोंढाणा आणि स्वराज्यात लावतो प्राणांची बाजी... शब्द असे, मातोश्री अन राजं सांगती सुभेदार तान्हाजी". या पोस्टरमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पुरकर (Ajay Purkar) आणि राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) दिसत आहे. 






'सुभेदार' सिनेमाच्या नव्या पोस्टरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरवर जेव्हा इतिहासाच्या पुस्तकातील आवडते चित्र सत्यात उतरते, कमाल पोस्टर, खूप छान पोस्टर, सिनेमा ब्लॉकबस्टर होणार, सुभेदारांचा लूक हुबेहुब वाटत आहे, राजं, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'सुभेदार' कधी प्रदर्शित होणार? (Subhedar Released Date)


'सुभेदार' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या बहुचर्चित सिनेमासाठी उत्सुक आहे. दिग्पाल लांजेकरने (Digpal Lanjekar) या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'मावळं जागं झालं रं...' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'सुभेदार'


'सुभेदार' या सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आधी हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण लोकाग्रहास्तव या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आता हा सिनेमा 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


संबंधित बातम्या


Subhedar : 'मावळं जागं झालं रं...'; दिग्पाल लांजेकरच्या 'सुभेदार' सिनेमातील पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; लोकाग्रहास्तव येत्या 18 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा