मुंबई : महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य सलमान खानला भोवण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाने सलमान खानला नोटीस पाठवली आहे. 29 जूनला दुपारी 2 वाजता आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश या नोटिशीतून देण्यात आले आहेत.

 

महिला आयोगापुढे 29 जून रोजी हजर राहून, वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

सलमानचं वादग्रस्त वक्तव्य

 

‘सुलतान’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.

 

‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं,’ असं विधान सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

 

संबंधित बातम्या :


सलमानच्या वादग्रस्त विधानावर बलात्कार पीडितेचं सडेतोड उत्तर


सलमानने माफी मागावी की नाही? अरबाज म्हणतो...


‘सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान


सलमानच्या ‘बलात्कार पीडित’ विधानावर सलीम खान यांचा माफीनामा