मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या बलात्काराबाबतच्या विधानामुळे वादात आहे. या वादाप्रकरणी सलमानचे वडील सलीम खान यांनी माफी मागितली आहे. मात्र अद्याप वाद शमलेला नाही.

 

वडिलांनतर सलमानचा भाऊ अरबाजही त्याच्या बचावासाठी मैदानात उतरला आहे. चूक लक्षात येताच सलमान माफी मागेल, असं अरबाज खानने म्हटलं आहे.

 

काही आपण सहज बोलून जातो. मात्र जे बोललो त्याबाबत आपला उद्देश काय होता, याकडे पाहायला हवं. सलमानचा चुकीचा उद्देश नव्हता यामध्ये शंका नाही. माझ्या खांद्यावर गाढवासारखं ओझं होतं, असं जर मी म्हणत असेल, तर प्राणीमित्र कदाचित गाढवाच्या उल्लेखावर आक्षेप घेतील. त्यामुळे कधी कधी आपण बोलतो, उपमा देतो, तेव्हा आपला उद्देश चुकीचा असतो असं नाही. मात्र यामुळे जर तुम्ही जास्त संवेदनशील झालात, तर तो वादाचा मुद्दा बनू शकतो.

 

सलमान माफी मागणार का? याबाबात बोलताना अरबाझ म्हाणाला, " मला विश्वास आहे की सलमानला त्याच्या वक्तव्याबाबत जाणीव झाली असेल. त्याने जी तुलना केली, ती योग्य नव्हती, हे त्याला कळून चुकलं असेल. त्याला वाटलं तर तो माफी मागेल. माफी मागावी की नाही, हे त्याच्यावर आहे. त्याने माफी मागायलाच हवी, हे मी सांगणं चुकीचं होईल"

 

‘सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान

 

‘सुलतान’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.

 

‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं,’ असं विधान सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

संबंधित बातम्या


सलमानच्या 'बलात्कार पीडित' विधानावर सलीम खान यांचा माफीनामा 


‘सुलतान’च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान