मुंबई: 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली या चित्रपटातील कटाप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाने अनेकांना हौराण केलं होतं. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर चित्रपट रसिकांना लवकरच मिळणार आहे. कारण या चित्रपटाचा 'बाहुबली: द कनक्ल्यूज'न सीक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे.

 

या चित्रपटाच्या क्ल्यायमॅक्सचे शूटिंग पूर्ण झाले असून, कटाप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाचा मुख्य अभिनेता प्रभास, दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि चित्रपटाचा कथा लेखक या तिघांनाच माहित आहे.

 

दरम्यान, बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 'बाहुबली: द कनक्ल्यूजन' या चित्रपटाची कॉपी लीक होऊ नये, यासाठी या चित्रपटाचे एक-दोन नव्हे, तर तब्बल चार क्लायमॅक्स शूट करण्यात आले आहेत. यातील कोणता क्लायमॅक्स चित्रपटात दाखवावा, याचा निर्णय अद्याप झाला नाही. मात्र, या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतरच याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

या चित्रपटाचा फर्स्ट लूक चित्रपटाचा फर्स्ट लूक लवकरच रिलीज होणार आहे. तर हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल. या चित्रपटात राणा डग्गुबाती, प्रभास, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहेत.

 

संबंधित बातम्या

बाहुबलीच्या सिक्वेलचा फर्स्ट लूक "या दिवशी"