शाहरुख खानच्या 'रईस'चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2016 11:43 AM (IST)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट‘रईस’चा ट्रेलरचा अखेर रिलीज झाला आहे. देशभरातील 3500 थिएटरमध्ये 'रईस'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यशराज स्टुडिओमध्ये हा ट्रेलर रिलीज झाला. या सोहळ्याला शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दकी, दिग्दर्शक राहुल ढोलकिया, निर्माता रितेश सिधवानी उपस्थित होते. या सिनेमात शाहरुख खानसह पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दिसेल. राहुल ढोलकिया दिग्दर्शित 'रईस'ची कथा 1980 च्या दशकातील गुजरातवर आधारित आहे. ही कथा एका दारु तस्कर रईस खानभोवती फिरते. रईसची भूमिका शाहरुखने साकारली आहे. 25 जानेवारी 2017 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मंगळवारीही या चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज झालं होतं. हे पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिलं होतं की, ‘आज रईसचं नवं पोस्टर पाहा ...उद्या ट्रेलर पाहायला मिळेल. आता #ApnaTimeShuru! https://twitter.com/iamsrk/status/806142758146609152 पाहा ट्रेलर