LIVE UPDATE :
8.30 am : श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, 9:30 वाजेपासून अंत्यदर्शन
7.00 am : आज दुपारी साडेतीन वाजता अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार
श्रीदेवी यांचं पार्थिव रात्री 9. 40 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालं. यावेळी कपूर कुटुंबीय त्यांच्यासमवेत होतं. टीना आणि अनिल अंबानी, अनिल कपूर, सोनम कपूर विमानतळावर उपस्थित होते.
विमानतळावर गेट क्रमांक 8 ने श्रीदेवींचं पार्थिव बाहेर आणण्यात आलं. श्रीदेवींच्या लोखंडवाला येथील ग्रीन एकर्स या निवासस्थानी ते आणण्यात येईल. जवळचे नातेवाईक, बॉलिवूड सेलिब्रेटी, चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत.
वर्सोव्यात सेलिब्रेशन क्लबमध्ये उद्या, म्हणजे बुधवारी सकाळी 9.30 ते 12.30 या कालावधीत श्रीदेवींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. दुपारी दोन वाजता श्रीदेवींच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल, तर साडेतीन वाजता विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दुबईतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 11-11.30 च्या सुमारास श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांपासून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत असलेलं श्रीदेवींचं पार्थिव अखेर खासगी विमानातून संध्याकाळी भारताकडे रवाना झालं.
श्रीदेवींच्या मृत्यूनंतर निर्माण झालेलं संशयाचं धुकंही विरलं आहे. हा घातपात नसून बाथटबमध्ये अपघाताने बुडूनच श्रीदेवींचा मृत्यू झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनाही क्लीन चिट मिळाली आहे.
दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांचीही चौकशी केली होती. ज्या हॉटेलमधील रुममध्ये श्रीदेवींचा मृत्यू झाला. ती खोली पोलिसांनी सील केली होती. तसंच श्रीदेवींचे कॉल डिटेल्सही तपासले होते.
संबंधित बातम्या :