नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. श्रीदेवी यांची हत्या झाली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
यावेळी बोलताना स्वामी यांनी असा दावा केला आहे की, 'हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसंच श्रीदेवी हार्ड लिकर (दारु) सेवन करत नसे. त्यामुळे मला असं वाटतं की, तिची हत्या करण्यात आली असावी.'
यावेळी बोलताना सुब्रमण्यम स्वामी यांनी एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. 'सिने अभिनेत्री आणि दाऊदचे जे सबंध आहेत. हे सबंधं अनैतिक आहेत. त्यावर देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पण याप्रकरणी सरकारी वकिलांचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे आपण त्याची वाट पाहिली पाहिजे. मीडियामध्ये याबाबत येणारं वृत्त सतत बदलत आहे. पण श्रीदेवी फार मद्य सेवन करत नव्हती. त्यामुळे तिच्या मृत्यूचं प्रकरण हे संशयास्पद नक्कीच आहे.' असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी राज्यसभा खासदार अमरसिंह यांनीही दावा केला आहे की, 'जिथवर मला श्रीदेवीबाबत माहिती आहे, ती हार्ड लिकर (दारुचं) सेवन करत नसे. श्रीदेवी ही फक्त वाईन घ्यायची आणि वाईनमध्ये अल्कोहलचं प्रमाण फार नसतं.'
दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनीही श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसंच तिचं पार्थिव भारतात आल्यानंतर पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचं पत्रंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं सत्य काय आहे याबाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे.
संंबंधित बातम्या :
'श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं', बालाकृष्णन यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी
श्रीदेवी बॉलिवूडमधल्या अघोरी स्पर्धेची बळी?
गूगल सर्चमध्ये काल दिवसभरात ‘श्रीदेवी’ टॉप
श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू, शरीरात दारुचे अंश आढळले
नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!
श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर
'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन
अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत
नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये...
श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल
श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार
म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं
श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार
'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द
लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट
दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो
बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीदेवी मद्यसेवन करत नव्हती, ही हत्या आहे : सुब्रमण्यम स्वामी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Feb 2018 01:10 PM (IST)
'हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसंच श्रीदेवी हार्ड लिकर (दारु) सेवन करत नसे. त्यामुळे मला असं वाटतं की, तिची हत्या करण्यात आली असावी.'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -