दुबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यूएईच्या खलीज टाइम्सने श्रीदेवी यांच्या शेवटच्या 30 मिनिटांची कहाणी छापली आहे. मृत्यूआधी तीस मिनिटं श्रीदेवींसोबत नेमकं काय-काय घडलं होतं याचा एक विशेष रिपोर्ट खलीज टाइम्सने प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, श्रीदेवी या बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या.

'बोनी कपूर श्रीदेवीला सरप्राईज डिनरवर घेऊन जाणार होते'

खलीज टाइम्सनुसार, 'शनिवारी रात्री बोनी कपूर मुंबईहून दुबईला आले. त्यानंतर ते श्रीदेवींना सरप्राईज डिनरवर घेऊन जाणार होते. त्यामुळे त्यांनी युएईतील जुमैरा एमीरैट्स टॉवर्स हॉटेलमधील रुममध्ये जाऊन श्रीदेवींना उठवलं आणि 15 मिनिटं बातचीत केली. त्यावेळी बोनी कपूर यांनी आपल्या पत्नीला डिनरसाठी निमंत्रण दिलं. त्यानंतर श्रीदेवी तयार होण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या.'



'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या'

'15 मिनिटं होऊन गेली तरी श्रीदेवी बाहेर आल्या नाही. त्यामुळे बोनी कपूर यांनी वॉशरुमचा दरवाजा ठोठावला. पण तरीही श्रीदेवी यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे बोनी कपूर यांनी जोराचा धक्का देत वॉशरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना श्रीदेवी बाथटबमध्ये पडलेल्या आढळून आल्या.' असं खलीज टाइम्समध्ये म्हटलं आहे.

'श्रीदेवी यांना त्या अवस्थेत पाहून बोनी कपूर यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीदेवी काही केल्या शुद्धीत येत नव्हत्या. त्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण तोवर श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.' अशी माहिती खलीज टाइम्सने दिली आहे.


श्रीदेवी यांचं शवविच्छेदन पूर्ण

श्रीदेवी यांचं पार्थिव आज मुंबईत आणलं जाणार आहे. दुबईत काल (रविवार) त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. यूएई अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचे शवविच्छेदन पूर्ण झालं असून त्यांचे कुटुंबीय हे आता फॉरेन्सिक एव्हिडेंसकडून मिळणाऱ्या लॅबोरेटरी रिपोर्टची वाट पाहत आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव त्यांच्या कुटंबीयांना सोपवण्यात येणार आहे.

श्रीदेवींचं पार्थिव अनिल अंबानींच्या चार्टर्ड विमानाने मुंबईत येणार

उद्योगपती आमि श्रीदेवी यांचे मित्र अनिल अंबानी यांचं चार्टर्ड विमान सध्या दुबईतच आहे. याच विमानाने श्रीदेवी यांचं पार्थिव हे मुंबईत आणलं जाणार आहे.

परवा (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवीला आपल्यापासून कायमच हिरावून घेतलं. अवघ्या 54 व्या वर्षी तिनं चाहत्यांना कायमचं पोरकं केलं. भाच्याच्या लग्नासाठी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसोबत श्रीदेवी दुबईमध्ये होत्या.

संबंधित बातम्या :

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन


अर्जुन कपूरसोबत घडलं, तोच दुर्दैवी योगायोग जान्हवीसोबत

नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये...

श्रीदेवींच्या निधनावरील शोकसंदेशाने काँग्रेस ट्रोल

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?