Bollywood: भारतीय चित्रपटसृष्टीत पहिली फीमेल सुपरस्टार म्हणून ओळखल्या गेलेली अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्या सोबत नाही, पण तिच्या आयुष्यातील किस्से आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत. तिचं करिअर, बोनी कपूर यांच्यासोबतचं लग्न आणि वैयक्तिक आयुष्य हे कायम चर्चेत राहिलं. पण श्रीदेवीच्या आयुष्यातील एक वेगळाच अध्याय म्हणजे तिची बहिण श्रीलता सोबतचं तुटलेलं नातं. (Sridevi Sister dispute)

Continues below advertisement

श्रीदेवी आणि श्रीलता या दोघींचं नातं एकेकाळी अतिशय घट्ट होतं. श्रीलता तिच्या बहिणीची सावली बनून राहायची. शूटिंगला जाणं, मिटिंग्ज सांभाळणं, शेड्यूल बघणं, सगळं तीच करायची. श्रीदेवीने तर एका मुलाखतीत म्हटलं होतं, “मी लग्न करेन तेव्हा लतालाही माझ्यासोबत घेऊन जाईन.” पण काळानुसार हे गोड नातं तुटलं, आणि इतकं ताणलं गेलं की प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. (Bollywood News)

कशामुळे बिघडलं नातं?

श्रीदेवींची आई राजेश्वरी अयप्पन यांना ब्रेन ट्युमर झाला होता. 1995 मध्ये अमेरिकेत त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली, पण डॉक्टरांच्या चुकीमुळे मेंदूच्या चुकीच्या भागावर ऑपरेशन झालं आणि त्यांच्या आईची स्मरणशक्ती गमावली. यानंतर श्रीदेवींनी त्या रुग्णालयाविरुद्ध खटला दाखल केला आणि 7.2 कोटी रुपयांचं नुकसानभरपाईचं प्रकरण जिंकलं. याच पैशांवरून बहिणींच्या नात्यात फूट पडली. आईच्या निधनानंतर तिच्या सर्व मालमत्तेची मालकी श्रीदेवीच्या नावावर गेली होती, आणि त्यामुळे श्रीलता दुखावली.

Continues below advertisement

कोर्टात केस, नातं पूर्णपणे तुटलं

या घटनेनंतर दोघींनी एकमेकांशी संवाद तोडला. श्रीलता यांनी प्रॉपर्टीमधील आपला हिस्सा मागत कोर्टात केस केली. तिचा दावा होता की, आईची मानसिक अवस्था ठीक नसताना प्रॉपर्टी श्रीदेवीच्या नावावर करण्यात आली. दीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाने श्रीलताला फक्त 2 कोटी रुपयांचा हिस्सा दिला.

शेवटी बोनी कपूरने केलं “पॅच-अप”

वर्षानुवर्षांच्या दुराव्यानंतर श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी दोघी बहिणींमध्ये समेट घडवून आणली. नातं पुन्हा काहीसं पूर्ववत झालं. 2013 मध्ये जेव्हा श्रीदेवींना ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला, तेव्हा श्रीलता आणि तिच्या पतीने त्यांच्या सन्मानार्थ खास पार्टीही आयोजित केली होती. कधीकाळी अतूट असलेलं नातं गैरसमज, पैसा आणि परिस्थितीच्या खेळात बिघडलं, पण शेवटी प्रेम आणि स्नेहानं पुन्हा ते जोडण्याचा प्रयत्न झाला.

हेही वाचा 

मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ, हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?