Yuzvendra Chahal On Dhanashree Verma: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Cricketer Yuzvendra Chahal) नेहमीच चर्चेत असतो. आता त्यानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यावेळी युजवेंद्र चहलची पोस्ट (Yuzvendra Chahal Post) त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारी आहे. त्यामुळे जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यानं धनश्री वर्मावर (Dhanashree Verma) अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या पोटगीबाबतच्या निकालावर युझीनं प्रतिक्रिया दिलेली, जी सध्या खूप व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

युजवेंद्र चहलनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, पण काही वेळानं ती पोस्ट त्यानं डिलिट केली. दरम्यान, युजवेंद्रनं डिलिट करुनही ती पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. युजवेंद्रनं कोर्टाच्या निकालाचा एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये म्हटलेलं की, "आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली पत्नी, त्याच्या पतीकडून पोटगी मागू शकत नाही..."  

युजवेंद्रचा धनश्रीवर निशाणा 

युजवेंद्र चहलनं दिल्ली हायकोर्टाच्या निकालाचा एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला आणि लिहिलंय की, "आई, शपथ घ्या की, तुम्ही या निर्णयापासून मागे हटणार नाही..." चहलची पोस्ट लगेचच व्हायरल झाली, ज्यामुळे चहल धनश्रीवर टीका करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर मात्र काही वेळातच चहलनं ही पोस्ट डिलीट केली. 

युजवेंद्र चहलची पोस्ट कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर धनश्री वर्मापासून वेगळं झाल्यानंतर काही महिन्यांतच समोर आली. चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट डिसेंबर 2020 मध्ये झालेला. मुंबई उच्च न्यायालयात खटल्यानंतर या वर्षी मार्चमध्ये वेगळं होण्यापूर्वी ते क्रिकेटमधील सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जोडप्यांपैकी एक होते. चहलनं धनश्रीला तब्बल 4 कोटी रुपयांची पोटगी दिलेली.  

घटस्फोटानंतर चहल आणि धनश्री दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. धनश्री वर्मा अलिकडेच 'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली, जिथे तिनं वारंवार तिच्या घटस्फोटाबद्दल चर्चा केली. मीडिया रिपोर्टनुसार, युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Twinkle Khanna On Physical Infidelity: 'रात गई बात गई...', 'फिजिकल बेवफाई'वर अक्षय कुमारची बायको, ट्विंकल खन्नाचं मत; नेटकरी म्हणाले...