जरीन खानच्या ‘अक्सर 2’मध्ये दिसणार टीम इंडियाचा माजी गोलंदाज
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2016 10:12 AM (IST)
नवी दिल्ली : अभिनेत्री जरीन खानच्या आगामी ‘अक्सर-2’ या सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. हा सिनेमा 2006 साली रिलीज झालेल्या ‘अक्सर’चा सिक्वेल आहे. 29 वर्षीय जरीनने ट्विटरवर सिनेमाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. https://twitter.com/zareen_khan/status/750916811466612736 इम्रान हाश्मी, उदिता गोस्वामी आणि दिनो मोरिया यांचा अभिनय असलेला अक्सर सिनेमा त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरला होता. अनंत महादेवन यांनीच सिक्वेलचंही दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमात जरीन खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर जरीनसोबत टीम इंडियाचा माजी गोलंदाज श्रीशांतही दिसणार आहे. स्वत: श्रीशांतने आपल्या ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. https://twitter.com/sreesanth36/status/750935109470187520 ‘अक्सर-2’च्या शूटिंगदरम्यान सेटवरचे काही फोटो श्रीशांतने ट्विटरवरुन शेअर केले आहेत. यावेळी श्रीशांतने म्हटलं आहे, “माझ्या नव्या सिनेमाची सुरुवात जबरदस्त झालीय.” यावेळी श्रीशांतने ‘अक्सर-2’ हॅशटॅगही दिला आहे.