प्रो-कबड्डी लीगमध्ये घुमणार सनी लिऑनचा आवाज
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2016 06:39 AM (IST)
मुंबई : अभिनेत्री सनी लिऑनने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी अशी जागा निर्माण केली आहे. फार सुपरडुपर हिट सिनेमे चालत नसले, तरी तिचा स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग आहे. मात्र, तरीही बॉलिवूडमधील अनेक अभिनेते इमेज खराब होण्याच्या भीतीने या बेबी डॉलसोबत काम करायला नकार देतात. मात्र, आता सनी लिऑन असं गीत गाणार आहे, ज्यामुळे सर्वांनाच तिचा अभिमान वाटेल. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सनी लिऑन प्रो-कबड्डी लीगमध्ये राष्ट्रगीत गाणार आहे. यावेळी तिच्यासोबत बाहुबलीचा अभिनेता राणा दुग्गाबतीही असेल. विशेष म्हणजे सनी लिऑनने राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही. खेळाला प्रमोट करणाऱ्या गोष्टींचं आपण पैसे घेत नसल्याचं सनी लिऑनने स्पष्ट केलं आहे. दरम्यान, याआधी अनेक अभिनेत्रींना प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावरुन राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये श्रद्धा कपूर, आलिया भट, श्रुती हसन आणि सोनाक्षा सिन्हा यांचा समावेश आहे. मात्र, आता ही संधी अभिनेत्री सनी लिऑनला मिळणार आहे. https://twitter.com/SunnyLeone/status/749901575280353280