Pakistani Actress Mahnoor Baloch Comments On Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्याला त्यांचा देव मानतात. तसेच सोशल मीडियावर त्याचे अनेक फॅनपेज आहेत. एसआरकेबद्दल (SRK) कोणी वाईट बोलत असेल तर त्याचे चाहते नाराज होत असतात. आता पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने (Mahnoor Baloch) शाहरुखबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 


पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोच शाहरुखबद्दल काय म्हणाली? (Mahnoor Baloch On Shah Rukh Khan)


हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने 'हद करदी' या पाकिस्तानी कार्यक्रमात किंग खानबद्दल (Mahnoor Baloch On Shah Rukh Khan) मोठं वक्तव्य केलं आहे. महनूर म्हणाली,"शाहरुखला अभिनय येत नाही. तो एक उत्तम व्यावसायिक आहे. स्वत:चं मार्केटिंग कसं करायचं हे त्याला ठाऊक आहे".


महनूर म्हणाली,"शाहरुखचं व्यक्तिमत्त्व चांगलं असलं तरी तो देखणा नाही. केवळ व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर तो चांगला दिसतो. अनेक सेलिब्रिंटीकडे सौंदर्य आहे पण तो ओरा नाही. पण एसआरकेच्या चाहत्यांनी त्याच्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे". 


शाहरुखला अभिनय येत नाही : महनूर बलोच


महनूर पुढे म्हणाली,"शाहरुखला अभिनय येत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. तो एक चांगला उद्योगपती असल्याने स्वत:चं मार्केटिंग कसं करावं हे त्याला बरोबर ठाऊक आहे. व्यक्तिमत्त्व चांगलं असल्याने तो त्या गोष्टीचं चांगलच मार्केटिंग करतो. अनेक चांगल्या दर्जाचे अभिनेते आहेत. पण अद्याप ते यशस्वी झालेले नाहीत". 



महनूरच्या या वक्तव्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते महनूरवर निशाणा साधत आहेत. शाहरुखबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने आपण लोकप्रिय होऊ असं महनूरला वाटल्याने तिने असं वक्तव्य केल्याचा अंदाज बांधला जात आहे. 


शाहरुख खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Shah Rukh Khan Upcoming Project)


सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या तीन दशकांपासून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नुकताच त्याचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आता त्याचा 'जवान' (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो नयनतारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच त्याचे 'डंकी' (Dunky) आणि 'टायगर 3' (Tiger 3) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan : "माझ्यासोबत सिगरेट ओढायला येणार का?" चाहत्याचा शाहरुखला थेट प्रश्न; किंग खानच्या उत्तरानं वेधलं लक्ष