मोहनलाल यांनी सांगितलंय की, आजपर्यंत महाभारत हे माहकाव्य कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धच दाखवलं गेलं होतं. पण पहिल्यांदा भीमाच्या व्यक्तीरेखेवर या सिनेमाची कथा आधारलेली असणार आहे.
सिनेमाचा सर्व खर्च यूएईमधील एक भारतीय व्यापारी करणार आहे. तसेच सिनेमाची निर्मिती दोन भागात होणार असून, याचं शूटिंग सप्टेंबर 2018 मध्ये सुरु होणार आहे. तर 2020 पर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होईल. सिनेमाचा दुसरा भाग पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर 90 दिवसातच चित्रपटगृहात दाखल होईल.
या सिनेमाचे निर्माते बी. आर. शेट्टींच्या कंपनीने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या पत्रकातून हा सिनेमा इंग्रजी, हिंदी, मल्याळी, कन्नड, तामिळ आणि तेलगू आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
विशेष म्हणजे, या सिनेमात मोहनलाल यांच्यासह हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलावंत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाच्या निर्मितीसाठी नियोजन सुरु आहे. महाभारत मोठ्या पडद्यावर साकारणे हे आपलं स्वप्न असल्याचं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने एकदा सांगितलं होतं. त्यामुळे या नव्या सिनेमात शाहरुख खान कोणती तरी व्यक्तीरेखा साकारेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, बाहुबली-2 हा सिनेमा सध्या प्रदर्शनासाठी सज्ज असून, या सिनेमाच्या निर्मितीसाठी अंदाजे 250 कोटी खर्च आला. तर मोहनलाल यांच्या 'द महाभारत'साठी 1000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.