35 वर्षीय अभिनेता विशगन वनांगमुडीसोबत सौंदर्या 11 फेब्रुवारीला लगीनगाठ बांधणार आहे. त्याने गेल्याच वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. विशगन हा चेन्नईतील फार्मास्युटिकल कंपनी अॅपेक्स लॅबचे संस्थापक एस एस वनांगमुडी यांचा मुलगा आहे. विशगनचंही याआधी लग्न झालं होतं, मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही.
सिल्क साडीतला दागिन्यांनी मढलेला फोटो सौंदर्याने ट्वीट केला आहे. 'ब्राईड मोड' 'वन वीक टू गो' 'वेद विशगन सौंदर्या' असे काही हॅशटॅग्ज तिने दिले आहेत. शनिवारीच सौंदर्याच्या आई लता रजनीकांत यांनी 10 आणि 12 फेब्रुवारीला आपल्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची विनंती करणारं पत्र पोलिस स्टेशनला लिहिलं होतं.
सौंदर्याने बिझनेसमन अश्विन रामकुमार यांच्यासोबत 2010 मध्ये एका भव्य सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. मतभेद वाढल्यामुळे सौंदर्याने डिसेंबर 2016 मध्ये फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जुलै 2017 मध्ये तिला घटस्फोट मंजूर झाला. सौंदर्या-अश्विन यांना वेद हा चार वर्षांचा मुलगा आहे.
2010 साली 'गोवा' या चित्रपटाची निर्मिती सौंदर्याने केली होती. कोच्चडियन चित्रपटातून सौंदर्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. कोच्चडियन हा भारताचा पहिला फोटोरिअॅलिस्टीक मोशन कॅप्चर चित्रपट होता. सौंदर्या ग्राफिक डिझायनरसुद्धा आहे. तिने दिग्दर्शन केलेल्या 'व्हीआयपी 2' या चित्रपटात तिच्या मोठी बहीण ऐश्वर्याचा नवरा - अभिनेता धनुष आणि काजोल मुख्य भूमिकेत होते.