मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याचा समावेश आता टीव्हीच्या सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत झाला असल्याची माहिती आहे. कपिलचं सोनी टीव्हीसोबतचं कॉन्ट्रॅक्ट एका वर्षासाठी पुन्हा रिन्यू करण्यात आलं आहे.
कपिलने नव्या कॉन्ट्रॅक्टसाठी तब्बल 100 कोटींपेक्षाही जास्त रक्कम घेतली आहे. बॉलिवूडच्या ए स्टार्सप्रमाणे कपिलने फी घेतली असल्याचं बोललं जात आहे. मात्र यासोबतच कपिलचं वार्षिक इनकम 110 कोटी रुपये झालं आहे.
कपिलाने कलर्सनंतर सोनी टीव्हीसोबत करार केल्यानंतर सोनीला त्याचा मोठा फायदा झाला. त्यामुळे कपिलसोबतचा करार आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.
यापूर्वी कपिलचा सर्वात जास्त कर भरणाऱ्या कलाकारांच्या यादीत क्रमांक लागला होता. तर गूगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या कलाकारांमध्येही अभिनेता सलमान खाननंतर दुसऱ्या क्रमांकावर कपिलचा क्रमांक होता.