Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood)

  लॉकडाऊन दरम्यान अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. अनेक लोक  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सोनूला मदत मागतात. त्यांच्या पोस्टला रिप्लाय देऊन सोनू त्यांना मदत देखील करतो. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनूच्या घराबाहेर लोकांची गर्दी दिसत आहे. 


भोवळ येऊन पडली महिलेला   
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सोनू सूदच्या घराबाहेर अनेक गरजू लोकांनी गर्दी केली आहे. हे लोक सोनूकडे मदतीची मागणी करत आहेत. सोनू या लोकांना मदत करण्याचं आश्वासन देखील देत आहे. या लोकांच्या हातात कागदपत्र आणि फाईल्स दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक महिला भोवळ येऊन पडलेली दिसत आहे. या महिलेली सोनूनं प्यायला पाणी दिलं.


सोनूनं अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. त्यानं तेलंगना येथील एका व्यक्तीची मदत केली होती. काही दिसांपूर्वी हा व्यक्ती कोमामध्ये गेला होता. या व्यक्तीचं नाव राम प्रसाद भंडारी आहे. रामनं नंतर सोनूचे आभार मानले होते. 


पाहा व्हिडीओ:  






सोनूनं तमिळ चित्रपटसृष्टीमधून करिअरला सुरुवात केली. त्यानं ‘कल्लाझागर’ या तमिळ चित्रपटामध्ये काम केलं. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद ए आजम’ या हिंदी चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे. चित्रपटांबरोबरच सोनू हा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Sonu Sood : 'आता दोन पायांवर चालायची वेळ आली; तिकीट पाठवतोय....' ; बिहारच्या मुलीला सोनू सूद करणार मदत