Sonu Sood: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) कोरोना काळात अनेकांची मदत केली. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सोनू हा वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. काही दिवसांपूर्वी सोनू सूदनं एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला आता उत्तर रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. उत्तर रेल्वे प्रशासनाच्या या रिप्लायनंतर सोनूला माफी मागावी लागली.
सोनूनं शेअर केला व्हिडीओ:
सोनूनं ट्विटरवर मुसाफिर हूँ यारों या गाण्यावरील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये सोनू हा धावत्या रेल्वेच्या दारासमोर बसलेला दिसत आहे. या व्हिडीओला उत्तर रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलनं रिप्लाय दिला की, 'प्रिय, सोनू सूद. देशातील आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही आदर्श आहात. ट्रेनच्या पायऱ्यांवर प्रवास करणे धोकादायक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असं करु नका! सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.'
सोनूनं मागितली माफी
सोनूनं रेल्वे प्रशासनाच्या ट्वीटला रिप्लाय दिला. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'क्षमस्व, जे लोक रेल्वेच्या दाराच्या जवळ आयुष्य जगतात, त्या लाखो गरीब लोकांना कसं वाटत असेल, हे पाहण्यासाठी मी तिथे बसलो होतो. या संदेशाबद्दल आणि देशाची रेल्वे व्यवस्था सुधारल्याबद्दल धन्यवाद.'
हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे. चित्रपटांबरोबरच सोनू हा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Sonu Sood: मदतीसाठी चाहत्यांची गर्दी; भोवळ येऊन पडलेल्या महिलेला सोनू सूदने दिलं पाणी