मुंबई : "मी मुस्लीमविरोधी नाही. फक्त अजानबाबत बोललो नव्हतो तर मंदिरं, गुरुद्वारांच्या लाऊडस्पीकरबद्दलही बोललो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा," असं म्हणत गायक सोनू निगमने अजानप्रकरणी माफी मागितली.


'मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?', असा सवाल सोनू निगमने ट्विटरवर केला होता.

सोनू निगमच्या अजानसंदर्भातील ट्वीटनंतर मुस्लीम कट्टरतावाद्यांनी त्याच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यानंतर आज सोनू निगमने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमला एका मौलानाने टक्कल करुन फिरवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सोनू निगम स्वत: आपल्या डोक्यावरचे केस कापून माध्यमांसमोर हजर झाला.



सोनू म्हणाला की, "मी एका सामाजिक प्रश्नाबद्दल बोललो, धार्मिक नाही. माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. मी मोहम्मद रफी यांना वडील मानलं आहे. माझा ड्रायव्हर मुस्लीम आहे. जे लोक मला मुस्लीमविरोधी बोलत आहे, तर तो माझा नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे.

लाऊडस्पीकर ही धार्मिक गरज नाही. माझ्यामते, लाऊडस्पीकर गुंडगिरी आहे. धर्माच्या नावावर लोक दारु पिऊन नाचतात ही गुंडगिरीच आहे. मी स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतो. माझी चूक असेल तर मला माफ करा.

मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला माझं मत मत मांडण्याचा अधिकार आहे तसा तुम्हालाही माझं मतं आवडलं नाही ते सांगण्याचा अधिकार आहे. ट्विटरवर एखाद्याला लिहायचं असेल तर कमी शब्दात लिहावं लागतं. त्यामुळेच मी मोहम्मद साहेब लिहिलं नाही.

मंदिरात आरती गरजेची आहे, लाऊडस्पीकर नाही. मी पहिला देशाचा नागरिक आहे, त्यानंतर कलाकार आहे. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला."

संबंधित बातम्या

मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम

'अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही', सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य