मुंबई : सुपरस्टार सलमान खानच्या मोस्ट अवेटेड ‘ट्युबलाईट’चा टीझर काल रिलीज झाला आणि आज सिनेमाचं पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.


या पोस्टरवर सलमान खान असून, त्यावर लिहिलं आहे, “क्या तुम्हें यकीन है?”. पोस्टरवरील या टॅगलाईनमुळे सिनेमाच्या कथानकाबद्दल सस्पेन्स आणखी वाढलं आहे.

या पोस्टरमध्ये सलमान खानच्या खांद्यावर बॅग अडकवलेली असून, डोक्यावर टोपी आहे. मात्र, सलमानचा चेहरा पोस्टरमध्ये दाखवण्यात आले नाही. या सिनेमाची शूटिंग मनालीमध्ये झाली आहे. मात्र, सलमानला पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.



‘ट्युबलाईट’चा कालच एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला होता. दिग्दर्शक कबीर खान याने ट्वीट करुन 13 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करत, लिहिलं होतं, “ईद मनाओ ट्युबलाईट के साथ.”

येत्या ईदच्या दिवशी सलमानचा ट्युबलाईट रिलीज होणार असून, शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे.

दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेता सलमान खान यांचा हा तिसरा सिनेमा आहे. एक था टायगर, बजरंगी भाईजान या सिनेमांनंतर आता ‘ट्युबलाईट’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/854575308334411777