संगीतमध्ये सोनम कपूर-आनंद अहुजाचा कपल डान्स
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2018 07:47 AM (IST)
लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या संगीत सोहळ्यात सोनमने नवरदेव आनंद आहुजासोबत ताल धरला.
नवी दिल्ली : बॉलिवूडची 'खूबसुरत' गर्ल सोनम कपूर आज विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या संगीत सोहळ्यात सोनमने नवरदेव आनंद आहुजासोबत ताल धरला. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनीही संगीत समारंभात दमदार डान्स परफॉर्मन्स दिले. वधूपिता अर्थात बॉलिवूडचा एव्हरग्रीन हिरो अनिल कपूरही संगीतमध्ये भांगडा करताना दिसला. पंजाबी गायक सुखबीर गाणं सादर करताना अनिल कपूरनी ठेका धरला. सोनमच्या मेहंदी आणि संगीतचे फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. याशिवाय करण जोहर, शिल्पा शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, जान्हवी आणि खुशी कपूर अशा अनेक सेलिब्रेटींचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. सोनमच्या काकी कविता सिंह यांच्या घरी सोनम आणि आनंद अहुजा यांचा विवाह सोहळा होणार आहे. बंगल्यातील मंदिरात सकाळी 11 ते 12.30 या वेळेत लग्नाचे विधी होणार आहेत. कपूर आणि अहुजा कुटुंबीयांतर्फे संध्याकाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंधेरीतील हॉटेल लीला मध्ये आयोजित केलेल्या पार्टीला इंडियन किंवा वेस्टर्न फॉर्मल हा ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे.