मुंबई: अभिनेत्री सोनम कपूर येत्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगली आहे. बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत सोनम लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.
आनंद आणि सोनम हे गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. हेच रिलेशन आयुष्यभरासाठी घट्ट करण्याचा निर्णय या जोडीने घेतला आहे.
महत्त्वाचं म्हणजे सोनम आणि आनंदच्या लग्नासाठी जोधपूरमधील ठिकाणही ठरवलं जात आहे.
सध्यातरी दोघेही लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. अजूनपर्यंत दोघांनीही आपलं नातं उघड केलेलं नाही. मात्र दोघे नेहमीच एकत्र दिसतात, एकत्र फिरायला जातात.
आनंद अहुजा हे दिल्लीतील व्यावसायिक आहेत. 'आनंद्ज अॅपरल्स' ब्रँडचे कपडे सोनम परिधान करताना आणि त्याचं प्रमोशन करताना वारंवार दिसते. मात्र त्याविषयी छेडलं असता सोनमने आपल्या खाजगी जीवनावर बोलण्यास साफ नकार दिला होता.
आनंद अहुजा आणि सोनम कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा आहे. सोनम आणि आनंद 2017 मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. मात्र आता हे वर्ष तरी संपलं आहे.