Sonakshi Sinha Zaheer Iqbal : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांची पर्सनल लाईफ कायम चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हाने मुस्लिम अभिनेता झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यापासून त्यांच्या नात्याची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. अनेकदा सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंट असल्याच्या अफवाही याआधी कानावर पडल्या आहेत. मात्र, सोनाक्षीने या अफवा वेळोवेळी फेटाळल्या आहेत. दरम्यान, दोघेही एकमेकांचे खास फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्याना त्यांच्या आयुष्याबद्दलच्या अपडेट्स देत असतात. आता सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 6 महिन्यांनंतर गूड न्यूज दिली आहे.
सोनाक्षी आणि झहीरचं लग्न
सोनाक्षी सिन्हाने जून 2024 मध्ये तिने झहीर इक्बालशी लग्न केले. त्या आधी त्यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा रंगली होती. सोनाक्षीचा लग्नसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला. त्यांनी त्यांच्या घरी रजिस्टर मॅरेज केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी सोनाक्षीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. लग्नानंतर त्यांनी एक भव्य रिसेप्शन ठेवलं होतं. या रिसेप्शनला अनेक मोठे सेलिब्रिटी, राजकारणी आणि उद्योगपती उपस्थित होते. लग्नानंतर सोनाक्षी अनेक वेळा झहीर इक्बालसोबत परदेशात फिरत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली.
सोनाक्षी सिन्हाची पोस्ट व्हायरल
आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मुलाशी संबंधित एक कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलंय 'मी नुकताच माझ्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे'. सोनाक्षी सिन्हाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहेत. सोनाक्षीच्या प्रेग्नेन्सीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मात्र, सोनाक्षीची ही पोस्ट एक प्रमोशनल पोस्ट आहे. यामध्ये सोनाक्षी एका प्रसूतीनंतरच्या केअर किट ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. सोनाक्षीने तिच्या नव्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी ही खास पोस्ट शेअर केली आहे.
सोनाक्षीने या ब्रँडला तिचं दुसरं मुलं म्हटलं आहे. कारण याआधीही तिने नेलपेंटच्या ब्रँडची सुरुवात केली आहे.
या सीरीजमध्ये झळकली सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या मालिकेत तिने फरीदानची भूमिका साकारली होती. सोनाक्षीची भूमिका आणि अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर ती 'काकुडा' चित्रपट झळकली. आता, अभिनेत्री सोनाक्षी आगामी 2025 नावाच्या चित्रपटात व्यस्त आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :