सोनाक्षी सिन्हाचा पुढील महिन्यात साखरपुडा?
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2017 12:56 PM (IST)
मुंबई : बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा यंदा साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, सोनाक्षी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये बॉयफ्रेण्ड बंटी सजदेहसोबत साखरपुडा करण्याची तयारीत आहे. मात्र तारखेबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. सोनाक्षी सिन्हाने बंटी सजदेहची आयुष्याचा सोबती म्हणून निवड केली असून दोघे पुढील महिन्यात साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे.