सोनाचा 'मूड' ऑफ, स्त्री असल्याने कमी मानधन ऑफर केल्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 17 Dec 2016 11:02 AM (IST)
मुंबई : प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने 'मूड इंडिगो' या जगप्रसिद्ध टेकफेस्टच्या आयोजकांवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ स्त्री असल्यामुळे मानधन देताना मिळालेल्या विषमतेच्या वागणुकीवर सोनाने बोट ठेवलं आहे. सोना मोहापात्राने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी जाहीर केली आहे. मुंबईतील आयआयटीच्या मूड इंडिगो या फेस्टीव्हलमध्ये जगभरातून अनेक विद्यार्थी सहभागी होत असतात. गेल्या तीन वर्षांपासून मूड इंडिगोच्या आयोजकांकडून आपल्याला कार्यक्रमासाठी निमंत्रण येतं. या निमंत्रणासोबत एक मोठी अट ठेवली जाते. महिला कलाकार एकटी परफॉर्म करु शकत नाही. पुरुष कलाकारासोबत तिने सादरीकरण करावं. सहगायिका म्हणून तिला मानधन मिळेल, मात्र पुरुष कलाकारांना घसघशीत मानधन दिल्याचं उघड झाल्याचं तिने म्हटलं आहे. सोनाने लिहिलेल्या खुल्या पत्रात मूड इंडिगो हा आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट असल्याचा दावा आयआयटी मुंबई करत असल्याबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना कोणता संदेश दिला जातो, यावर विचार करण्याचा सल्लाही तिने दिला आहे. वाचा संपूर्ण पोस्ट :