Amitabh Bachchan Cryptic Post : ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या जोडप्याने एप्रिल 2007 मध्ये लग्न केले आणि त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी आहे. मात्र, मागील काही काळापासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. या दोघांचा काडीमोड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. 


अभिषेक किंवा ऐश्वर्या दोघांनीही त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर उघडपणे भाष्य केले नाही. मात्र, अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यात ऐश्वर्या आणि आराध्या या बच्चन कुटुंबासोबत न आल्याने चर्चांना आणखीच उधाण आले होते. मात्र, नुकतीच ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत जलसामध्ये प्रवेश करताना दिसली. त्यातच आता अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. 


बिग बींनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?


अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्ल़ॉगमध्ये लिहिले की, "काल रात्रीच्या ब्लॉगवरील शेवटचे विचार 'प्रतिबिंब' बद्दल होते... हा 'शेर' हे सर्व सांगत असल्याचे त्यांनी म्हटले. अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, जेव्हा मी आरशात पाहिले तेव्हा मला धक्का बसला. हा चेहरा जो मला आता दिसत होता. काही वर्षांपूर्वीची वेगळी वेळ... मी दुसऱ्या रविवारी GOJ च्या कॉलची वाट पाहत आहे... आणि तरीही आश्चर्य वाटते की ते कोणता चेहरा असेल ज्याने मला इतका वेळ, प्रेम आणि लक्ष देऊनही हाक मारली असेल." अशा आशयाचा शेर त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केला. 




अखेर सगळंकाही संपून जातं....


अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये पुढे  स्वत: आशावादी असल्याचे म्हटले. आयुष्य आणि मिळणारी प्रसिद्धी ही अल्पायुषी असल्याचे त्यांनी म्हटले.  


बिग बी यांनी लिहिले, "मला माझ्या खिडकीतून जयजयकाराचा आवाज ऐकू येतो आणि मला आशेने दिलासा मिळतो... पण आयुष्य आणि प्रसिद्धी अल्पकाळ टिकते... आयुष्य सुकून जाते आणि संपते, ध्यान हे सुकून जाते आणि अंतत: संपून जाते. सगळीकडे एकच समानता आहे आणि ती म्हणजे हे सगळं संपून जाते. 


बिग बींच्या पोस्टचा अर्थ काढण्यास सुरुवात...


अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टने सगळ्यांना विचारात पाडले आहे. त्यांच्या या पोस्टचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे काढण्यास सुरुवात झाली आहे. बिग बींच्या क्रिप्टिक पोस्टचा नेमका अर्थ काय, याची चर्चा सुरू झाली आहे.