मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर खान तैमूरचे आई-बाबा बनल्यानंतर आता पतौडी कुटुंबाला नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. पतौडी खानदानची लेक सोहा प्रेग्नंट आहे.
अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. स्वत: कुणाल आणि सोहाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
"होय, हे खरंय... सोहा आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की, आमचं जॉईंट प्रॉडक्शन या वर्षअखेरीस येणार आहे - आमचं पहिलं बाळं. आमच्यावर कृपावृष्टी झाल्यासारखं वाटतंय. तुमच्या शुभेच्छांसाठी आभार," असं कुणाल खेमूने सांगितलं.
सोहा आणि कुणाल यांचा विवाह 25 जानेवारी, 2015 रोजी झाला होता.