गणपत जाधव हे पत्नी शांता आणि पुतण्यासह कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत राहत होते. राहत्या घरी शुक्रवारी संध्या 6.45 सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. गणपत जाधव यांच्यावर आज (शनिवार) अंत्यसंस्कार होणार आहेत.
निधनाचं वृत्त समजताच भरत यांच्यासह त्यांचे भाऊ किरण, राजू आणि बहीण छाया यांना कोल्हापूरला रवाना झाले.
गणपत जाधव हे टॅक्सीचालक होते. अत्यंत कष्टातून त्यांनी भरत जाधव यांची कारकीर्द घडवली. विशेष म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या गाडीचे चालक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.
संबंधित बातमी : मराठमोळ्या भरत जाधवची भारदस्त मर्सिडीज